साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्य सेवेत आणखी एक मानाचा तुरा.
कौतुकास्पद ! इंटरनॅशनल एक्सलन्स हेल्थ आरोग्य अवॉर्ड द्वारे साई सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु यांना बेस्ट हॉस्पिटल रुरल एरिया याने सन्मानित .
सोमेश्वरनगर वार्ताहर (दि. २) - १ जुलै हा डॉक्टरांचा दिवस आहे. (डॉक्टर डे) म्हणून सर्वत्र साजरा करतात ...हा दिवस आमच्यासाठी सर्वात अविस्मरणीय आहे...त्याचे कारण आम्ही ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत आणखी एक मानाचा तुरा स्थापित केला आहे. कळविण्यात आनंद होतो की साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू साठी ग्रामीण भागातील सेवेकरिता मुंबई येथे आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट आरोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ विद्यानंद भिलारे यांनी दिली पुढे बोलताना म्हणाले की निश्चितपणे हा पुरस्कार आमच्या सर्व टीम च्या प्रामाणिक आणि उत्कट कार्याचा पुरस्कार आहे. सर्व रुग्ण आणि जवळपासच्या गावकऱ्यांबद्दल आम्ही खूप आभारी आहोत ज्यांनी विश्वास ठेवला आणि दिवसेंदिवस सुधारण्यासाठी त्यांना सेवा देण्याची संधी दिली.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिल्याबद्दल आणि आमच्या ग्रामीण भागातील कार्याची दखल घेतल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत त्यामुळे आमच्या बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर गावात ग्रामीण भागात अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल.
■ डॉ विद्यानंद भिलारे
संचालक एसएसएमएच आणि आयसीयू
■ डॉ राहुल शिंगाटे
संचालक एसएसएमएच आणि आयसीयू
■ डॉ शुभम शहा
संचालक ऑर्थो एसएसएमएच आणि आयसीयू.
................................................
टीम साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू
मुख्य संपादक-विनोद गोलांडे
संपर्क-९७६२२०८४३७