Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! जिल्हा परिषदेकडून आदित्यचा गुणगौरव ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आदित्यला मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान

सोमेश्वरनगर ! जिल्हा परिषदेकडून आदित्यचा गुणगौरव ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आदित्यला मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी या शाळेचा विद्यार्थी आदित्य दिपक पंडित शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ च्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता सी.बी.एस.ई गटातून पाचव्या क्रमांकावर आला होता. या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार दिनांक ०९/०९/२०२३ रोजी पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने अल्प बचत भवन पुणे येथे संपन्न झाला. 
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आदित्यला मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी आदित्यचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test