स्तुत्य उपक्रम ! डॉ मनोज खोमणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर मंदिरे येथे केळी वाटप
सोमेश्वरनगर - बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र होळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने व श्रावण महिन्यातील तिसरा सोमवारी सोमेश्वर मंदिर येथे येणाऱ्या भाविकांना केळी वाटप करण्यात आली, यावेळी बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे , श्री सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या वाईस चेअरमन प्रणिता खोमणे ,बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा चेअरमन अनिलदादा खलाटे सह श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट चे मान्यवर उपस्थित होते.