जालना जिल्ह्यातील अमानुष लाठीचार घटनेचा जाहीर निषेध सभा व बंदला चौधरवाडी गावचा पाठींबा.
सोमेश्वरनगर - जालना जिल्ह्यातील मराठा समाजावरील बांधवांना अमानुषपणे लाठीचार केल्याबद्दल जाहीर निषेध सभा बारामती तालुक्यातील चौधरवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे सोमवार दि ४ रोजी सकाळी जाहीर निषेध सभा व बारामती बंदला पाठिंबा देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी चौधरवाडी ग्रामपंचायत कार्यालया समोर उपस्थित होते तसेच वडगांव निबाळकर अंकित करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस हवालदार रमेश नागटिळक आणि पोलीस पाटील राजकुमार शिंदे यांच्याकडे निवेदन सुपूर्त करण्यात आले
यावेळी सुखदेव शिंदे ,संपत पवार ,धीरज पवार यादवराव शिंदे ,मोहन चौधरी ,महेंद्र पवार, सोमनाथ देशमुख ,विशाल पवार, महादेव चौधरी,विजय चौधरी ,सोमनाथ पवार ,विनायक चौधरी सह आदी मान्यवर उपस्थित होते.