Type Here to Get Search Results !

तालुक्यातील शेतकरी चुकीच्या वीजेच्या भारनियमनामुळे हैराण

तालुक्यातील शेतकरी चुकीच्या वीजेच्या भारनियमनामुळे हैराण                    
दाैंड - दाैंड तालुक्यातील विद्युत भारनियमनामुळे शेतकरी हैराण         दाैंड तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असतानाच शेतक-यांवर पावसापाठाेपाठ विजेच्या जीव घेण्या भारनियमनामुळे दुहेरी संकट उभे राहिलेले आहे.त्यातच तिसरे संकट म्हणजे दाैंड तालुक्यात वाढलेला बिबटयाचा वावर यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.
दाैंड तालुका महावितरण कंपनीचे अधिकारी व पदाधिका-यांनी नियाेजन करुन केलेले विजेच्या भारनियमनाचे वेळापत्रक हे शेतक-यांना त्रासदायक ठरत आहे. रात्री अपरात्री हाेणा-या विद्युत पुरवठयामुळे नदी,विहीरी व बाेरवेलला पाणी असतानाही  बिबटयाच्या भीतीमुळे शेतक-यांना रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देणे शक्य हाेत नसल्याने शेतातील सर्वच पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.४ ते ५ तास मिळणारी वीज ही निट मिळत नाही.त्यातही सततचे वीजेचे लपनडावांमुळे  तर दाैंड तालुक्यातील छाेटे-माेठे व्यावसायिक विजेच्या भारनियमनामुळे हैराण झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत शासनाला शेतकरी व व्यावसायिकांचे काहीही साेईरसुतक नाही.त्यामुळे दाैंड तालुक्यातील हैराण झालेले शेतकरी व व्यावसायिकांमधून  शासनाच्या व महावितरण कंपनीच्या विराेधात तीव्र स्वरुपाचे  आंदाेलन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम दाैंड

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test