येरे येरे पावसा पण जाऊ नको रे बाबा...सोमेश्वर परिसरात श्रावण सरीचे आगमन
सोमेश्वरनगर - बारामती तील सोमेश्वरनगर परिसरात श्रावण सरीचे आगमन रविवारी संध्याकाळी दरम्यान सुरू झाले मोसमी पावसाने चांगलीच पाठ फिरवली होती, परंतु सध्या श्रावण महिना चालू आहे ...या श्रावण सरी कोसळल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ...पावसाचा मनसोक्त आनंद लहान मुले घेत आहे तर या श्रावण सरी मध्ये बीजत ...येरे येरे पावसा तुला देतो पैसा ...पैसा झाला खोटा.. पाऊस आला मोठा ....असे आनंदाने गीत म्हणत होते ...अनेकांना या गीताचा आनंद झाला परंतु येरे येरे पावसा पण आता जाऊ नको रे बाबा असे काहीं शेतकऱ्यांच्या बोलण्यातून येत आहे ,पावसाच्या श्रावण सरी कोसळल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील तरकारी पिकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.