"सोमेश्वर" ला भाद्रपदि बैलपोळा मोठ्या उत्साह.
सोमेश्वरनगर - वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी हा एकमेव सण आहे. दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी सर्व बाजूला सारुन शेतकरी हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदामळणी केली जाते तर पोळ्यादिवशीचा उत्साह काही औरच असतो. भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये आज देखील मोठ्या प्रमाणावर बैलांच्या साह्याने शेती केली जाते. त्याच बैलांच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो.
बारामती तील सोमेश्वरनगर परिसरात करंजेपुल, करंजे, मगरवाडी, वाकी ,सोरटेवाडी सह परिसरात अनेक भागात भाद्रपद पोळा करण्याची परंपरा आहे पोळा सणाचा उत्सव हा दोन दिवासांचा असतो. पहिल्या दिवशी खांदामळणी केली जाते. जी बैलजोडी वर्षभर आपल्या खांद्यावर ओझे वाहातात त्याच खांद्याची पूजा करुन त्याची मळणी केली जाते. शिवाय या दिवशी जनावरे स्वच्छ धुतली जातात. तर सायंकाळी पूजा करुन खांदामळणी केली जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा जनावरे धुतली जातात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गायीबरोबर बैलांचे लग्न लावले जाते. यामध्ये वेगवेगळ्या मंगळआष्टीकाही असतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात.