Type Here to Get Search Results !

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी येरवडा मनोरूग्णालयात स्वतःची तपासणी करून घ्यावी - सतिशराव काकडे

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी येरवडा मनोरूग्णालयात स्वतःची तपासणी करून घ्यावी - सतिशराव काकडे
सोमेश्वरनगर - मी वर्तमान पत्रांमधुन काही दिवसांपूर्वी सभासदांना दिपावली निमित्त देण्यात येणाऱ्या साखरे बाबत व कारखान्याच्या झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये विचारलेल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चेअरमन यांना जाब विचारला होता. परंतु चेअरमन यांनी चार दिवसांपूर्वी साखर व कारखान्या विषयी खुलासा करण्याऐवजी माझ्यावरच व्देषापोटी बोलले के जे हास्यास्पद व पोरकटपणाचे आहे. चेअरमन यांनी सभासदांच्या
महत्वाच्या प्रश्नांना नेहमी प्रमाणे बगल देवुन मु.सा. काकडे कॉलेजची न्याय प्रविष्ठ असलेली बाब पुढे करून सभासदांची पुर्ण दिशाभुल केलेली आहे. वास्तविक कॉलेज विषयीची भुमिका मी यापूर्वीच अनेक वेळा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहिर केलेली आहे. तरीही चेअरमन यांनी गरळ ओकुन विषय काढलाच असल्याने मी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व कारखान्याच्या विषयी लेखी स्वरूपात माहित्या मागविल्या आहेत. तसेच कारखाना उभारणीच्या वेळी ज्या ज्या सभासदांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांची नावे व क्षेत्र ही देखील माहिती मागितलेली आहे. तसेच स्वतः चेअरमन म्हणतात की त्यांची २८ एकर जमिन गेलेली
आहे त्याचाही ७/१२ मागितलेला आहे तरी सदर माहित्या तात्काळ याव्यात असे आवाहन मी
कारखान्यास करतो. की जेणे करून मला मु.सा. काकडे कॉलेजच्या विषयी सविस्तर माहिती सर्व सभासदांना देता येईल. मी चेअरमन यांना सभासदांना देण्यात येणाऱ्या साखर व कारखान्याच्या संबंधीत असणाऱ्या विषयाबाबत
खुल्या चर्चेचे आवाहन केले होते. परंतु त्यांनी ते सोडुन नुऱ्या पैलवानाने चर्चा करण्यासाठी मु.सा. काकडे कॉलेजवर सभा घेण्याचे मलाच आवाहन केले की जे मुर्खपणाचे आहे. वास्तविक कारखान्याचे चेअरमन तुम्हीच असल्याने साखर व कारखान्या विषयी सभा बोलविण्याचा अधिकार तुम्हाला आहे हे तुम्ही विसरलेले दिसता. उलट कारखाना सुरू होण्याआधी तुम्ही कारखाना कार्यस्थळावर सर्व सभासदांना निमंत्रीत करून सभा
बोलवावी. तसेच वार्षिक सर्व साधारण सभेत घाईगडबडीत जे आठ विषय २ मिनिटांमध्ये विषयाचे वाचन न करता मंजुर मंजुर म्हणुन मंजुर केले त्यावरही चर्चा करता येईल, जेणे करून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.
चेअरमन म्हणतात की ३० किलो साखर देणे ऐवजी १० किलो  साखर देणे बाबतचा निर्णय मागील
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झालेला आहे. आहो चेअरमन कुठलाही सभासद ३० किलो ऐवजी १० किलो साखर या असे म्हणेल का? साखरेच्या विषया बाबत मागील वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये चर्चाच झाली नाही की त्याचे आपण नेहमी प्रमाणे खोटे प्रोसिडींग केले व ज्यांची नावे आपण त्या ठरावास सुचक अनुमोदक म्हणुन टाकली आहेत ते सभासद सुध्दा आमचा या ठरावाबाबत काही संबंध नाही असे म्हणत आहेत. तरी चेअरमन यांना विनंती करण्यात येत आहे की सभासदा विषयी जर खरच कळवळा असेल तर त्यांनी दि. २९/०९/२०२३ रोजी कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा झालेली आहे की त्याचे अजुन प्रोसिडींग लिहीलेले नसेलच त्यामध्ये दिपावली निमित्त ३० किलो साखर देणे बाबतचा विषय घ्यावा म्हणजे तुम्हाला सभासदांना दिपावली निमित्त ३० किलो साखर देता येईल. तसेच माळेगाव कारखान्याने मागील वर्षाच्या प्रोसिडींगमध्ये जसा १० गावे जोडण्याचा निर्णय घेतला होता तो त्यांनी चालु वार्षिक सभेत कायम
स्वरूपी सोमेश्वरची १० गावे घेण्यात येणार नाहीत असे प्रोसिडींग केले आहे. तसेच चेअरमन यांना
तातडीची विशेष सभा घेता येते त्याप्रमाणे तातडीची सभा घेवून त्यामध्ये १० किलो साखरेचा खोटा ठराव
रद्द करून ३० किलो साखर सभासदांना दिपावली निमित्त देणे हा विषय मंजुर करून घेता येईल. व
सभासदांना दिपावली निमित्त तात्काळ ३० किलो साखर वाटप सुरू करता येईल. चेअरमन म्हणतात जादा साखर दिली तर इन्कमटॅक्स भरावा लागतो. आहो चेअरमन आता सभासदांना दिपावली निमित्त जी १० किलो साखर देणार आहात त्यालाही टॅक्स भरावा लागणार आहेच की? तसेच सातारा, सांगली व कोल्हापुर जिल्ह्यातील काही कारखाने सभासदांना ७० किलो पासुन १०० किलो पर्यंत २ रूपये किलो, ४ रूपये किलो, ७ रूपये किलो प्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासुन सभासदांना साखर देत आलेले आहेत व कृष्णा कारखाना तर गेली १० ते १२ वर्षापासुन सभासदांना वर्षाला १०० किलो साखर मोफत देत आहे. त्यामुळे चेअरमन यांनी सभासदांना टॅक्स चे नाटक सांगु नये. चेअरमन म्हणतात सभासदांना जादा साखर दिल्यास
२५/- रू. प्रती मे. टन नुकसान होईल तर मग मला चेअरमन यांना विचारायचे आहे की आत्तापर्यंत गेल्या अनेक वर्षापासुन सभासदांना जादा साखर, संचालकांना १०० किलो साखर दिली त्यावेळेस उस दरावर परिणाम झाला नाही का? त्याचप्रमाणे चेअरमन तुम्ही सभासदांच्या उस बिलातुन १५ कोटी रूपये ठेव विमोचन निधी कपात केला व कारण नसताना शासनाकडे दिड कोटी रूपये टॅक्स भरला तेव्हा तुम्हाला सभासदांचा कळवळा आला नाही का? व जरी टॅक्स भरायचा असल्यास तो सभासदांच्या उस बिलातुनजाणार आहे तुमच्या खिशातुन नाही. त्याचप्रमाणे चेअरमन यांनी काल यु-ट्युब वर सभासदांनी पुढील वार्षिक सर्व साधारण सभेत ५० किलो साखर दिपावली निमित्त मिळावी असा ठराव करून घ्यावा असे म्हणत आहेत की जो पोरकटपणाचा विषय आहे. म्हणजे पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत तुम्ही चेअरमन नसणार असे स्वतःच सुचीत करीत आहात. तरी तुमचा लवकरच चेअरमन पदाचा कार्यकाळ संपत असल्याने गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही ३० किलो साखर दिपावली निमित्त देणे बाबतचा ठराव करून घ्यावा की जेणे करून जाता जाता तुम्ही सभासदांचा
तळतळाट घेणार नाही. लवकरच मला कारखान्याकडुन माहित्या मिळाल्या नंतर मु.सा. काकडे कॉलेज,सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व कारखान्यातील इतर विषयांबाबत प्रेसनोट देणार आहे. व यु-ट्युब वर सभासदांशी संवाद साधणार आहे. तसेच माझ्यावर वैयक्तिक टीका करून खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्यावरही लवकरच खुलासा करणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test