काकडे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लालबहादूर शास्त्री यांची जयंती व स्वच्छता आभियान
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा.काकडे महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लालबहादूर शास्त्री यांची जयंती व स्वच्छता आभियानाचे आयोजन दि. २आक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लालबहादूर शास्त्री यांची जयंती व स्वच्छता आभियानाचे आयोजन करण्यात आले होते.प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे व महाविद्यालयाचे सचिव . सतिश लकडे यांनी प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी मनोगत व्यक्त करताना कृतीतून या महात्म्यांना अभिवादन केले पाहिजे असा संदेश दिला.महात्मा गांधी यांचे विचार सर्वानी आचरणात आणावे असे सांगीतले तसेच स्वच्छतेचे महत्त्व सांगून कृतीत उतरविन्यात सांगीतले .राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिना निमित्ताने महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना तसेच भारत सरकार,महाराष्ट्र शासन,उच्च व तंत्रज्ञान विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये विद्यार्थी विकास मंडळातील विद्यार्थ्यांनी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सर्व रस्ते तसेच मैदानाची स्वच्छता केली. महाविद्यालययाचे प्राचार्य डॉ. वायदंडे महाविद्यालयाचे सचिव सतिश लकडे विद्यार्थी कल्याण अधिकारी व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय डुबल व मेघा जगताप एन.सी.सी अधिकारी डॉ. श्रीकांत घाडगे व सेवक वर्ग यांनीही विद्यार्थ्यांबरोबर श्रमदानात सहभाग घेतला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रविंद्र जगताप ,प्रा.जी.एस काळे प्रा डी.जी जगताप, आर.डी गायकवाड, राजू काळे या उपक्रमासउपस्थित व सहभागी होते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.