Type Here to Get Search Results !

सेफ्टी अलर्ट ! सोमेश्वरनगर पंचक्रोशीमध्ये चोरीचे प्रकरणास आळा घालण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्या..गावातील नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात रहात रात्री १२ ते ४ या वेळेत सावध राहावे .

सोमेश्वरनगर पंचक्रोशीमध्ये चोरीचे प्रकरणास आळा घालण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्या..

गावातील नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात रहात रात्री १२ ते ४  या वेळेत सावध राहावे .

सोमेश्वरनगर - मा पोलीस उपनिरीक्षक यांच्या आदेशानुसार करंजे गावातील सर्व नागरिकांना कळविणेत येते कि , मागील आठवड्यापासून सोमेश्वरनगर पंचक्रोशीमध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे . तरी सर्व नागरिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी 
१) गावातील नागरिकांनी रात्री १२ ते ४  या वेळेत सावध राहावे .
२) आपल्या जवळ असणारी रोख रक्कम व दागिने घरात ठेऊ नयेत ,बँक किंवा इतर ठिकाणी लॉकर मध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवावेत .
३) गावातील सर्व दुकानदार यांनी रोख रक्कम किंवा मौल्यवान ऐवज सुरक्षित ठिकाणी ठेवावा .
४) गावात अनोळखी व्यक्ती आल्यास किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ गावातील पोलीस पाटील , किंवा प्रशासनाशी संपर्क करावा .
५) गावात दिवसा फिरणारे भंगारवाले ,फेरीवाले ,इतर व्यावसायिक यांचेकडून सामान खरेदी करताना काळजी घ्यावी . 
६) आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बंद घरांवर जाता – येता लक्ष ठेवावे .
७) गावामध्ये कसल्याही प्रकारची चोरी होणार नाही याची सर्व ग्रामस्थ व तरुणांनी सतर्क राहून रात्रगस्त करून सहकार्य करावे .
करंजेपुल दूरक्षेत्र नंबर :- +912112282133 
सतर्क राहा सावध राहा
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test