Type Here to Get Search Results !

Crime News सुपा पोलिसांनी शेतकऱ्याचे पशुधन (बोकड) चोरणाऱ्या दोन चोरांना केले जेरबंद

Crime News  सुपा पोलिसांनी शेतकऱ्याचे पशुधन (बोकड) चोरणाऱ्या दोन चोरांना केले जेरबंद 
बारामती - सुपा पोलिसांनी शेतकऱ्याचे पशुधन (बोकड) चोरणाऱ्या दोन चोरांना केले जेरबंद दिनांक २० रोजी रात्री १० वाजून ३०  मिनिटांनी ढोपरे मळा, बाबुर्डी तालुका बारामती येथे मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी नामे भागचंद नंदाराम कुमावत यांच्या गोठ्यातून दोन बोकड चोरीला गेल्याची माहिती प्राप्त होताच सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस हवालदार शितोळे, पोलीस शिपाई तुषार जैनक, होमगार्ड काळभोर व नवले असे मिळून पथक तात्काळ रवाना होऊन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी ढोपरे मळा बाबुर्डी येथील वरील नमूद शेतकऱ्याच्या गोट्यातून दोन काळे रंगाचे बोकड चोरलेले चौकशीमध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी नामे १. महेश मनोहर भंडलकर वय २३ वर्ष व २. फारुख सदृदिन शेख वय २२ वर्ष, दोन्ही राहणार काराटी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना सदर तपास कामी गुन्ह्यांमध्ये अटक करून त्यांना माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, बारामती यांच्या समक्ष हजर केले असता आरोपी यांना दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली. अटक आरोपी यांच्याकडून चोरलेले दोन बोकड  २०,०००/- रुपये  किमतीचे गुन्ह्याच्या तपासात जप्त करण्यात आले. अटक आरोपी यांच्याकडून आणखी काही शेतकऱ्यांचे पशुधन चोरलेले गुन्हे उघड होण्याचे दाट शक्यता असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार शेंडगे हे करीत आहेत.
   सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अंकित गोयल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग  गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहा.फौजदार शेंडगे ताकवणे पोहवा शितोळे ,राहुल भाग्यवंत, साळुंखे  पोलीस शिपाई , जैनक, ताडगे, साळुंखे मेजर , जविर व वणवे होमगार्ड काळभोर व नवले यांनी मिळून केली.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test