करंजे येथे सोमवती निमित्त "सोमेश्वर"पालखी सोहळा ढोल ताशांच्या गजरात...
दिपावलीत "सोमेश्वर"पालखी सोहळा आल्याने करंजे करांचा आनंद द्विगिणीत
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोरटी सोमनाथ प्रतिरूप मानले जाणारे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर,करंजे आहे... सोमवती आमावस्या निमित्त सोमेश्वर महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा ...यावर्षी सोमवती अमावस्या दीपावली मध्ये असल्याने करंजेकर यांचा आनंद द्विगुणीत झाला होता, फटकारे घरासमोरील आकाशकंदील तसेच दीपमाळा असल्याने संपूर्ण करंजे लाखलखित होते ...सोमवार दि १३ रोजी सोमवारी सोमवती अमावस्या निमित्त सोमेश्वर महाराजांची मूर्तीपालखी सोहळा सोमेश्वर मंदिर करंजे येथून निरा स्नान उपस्थित मानकरी व पुज्यारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत जात असते.... खांदेकरी मानकरी व पुजारी वर्ग यांच्या उपस्थितीत प्रस्थान झाले दुपारी बारा वाजता मूर्ती निरा स्नान होत निबुत , करंजेपुल मार्गे संध्याकाळी करंजे गाव येथे दाखल होते...या सोहळ्यानिमित्त श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते....दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्त आस्वाद घेत असतात ... सायंकाळची सोमेश्वर मूर्ती महाराजांची आरती ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली...पारंपरिक वाद्य 'डोल ताश्याच्या गजरात व गुलालाची उधळण करत पालखी प्रस्थान केली मुख्य पेठेतून पालखी मिरवणूक निघत असते,, या पालखी सोहळ्यानिमित्त सडा रांगोळी तसेच राजेंद्र ननवरे (करंजे) यांच्या मार्फत महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पायघड्याळाचे आयोजन करण्यात आले यावेळी ननवरे कुटुंब व मित्र परिवार उपस्थित होते.