मा कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर येथे महारुद्र अभिषेक व भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन
शिबिरास युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद ; ८३ बाटल्यांचे रक्त संकलन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथील श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थांच्या वतीने शरदचंद्रजी पवार व प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सोमेश्वर मंदिर येथे महारुद्र अभिषेक व केक कापण्याचा कार्यक्रम सोमेश्वर पंचक्रोशीतील उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित झाला तसेच भव्य रक्तदान शिबिर चौधरवाडी येथे आयोजित केले होते व या शिबिराचे उद्घाटन श्री सोमेश्वर सह साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी संचालक रुपचंद शेंडकर, उद्योजक संतोष कोंढाळकर ,चौधरवाडी सरपंच शशिकांत पवार सह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मान्यवर ग्रामस्थ तसेच करंजे सरपंच भाऊसो हुंबरे, करंजेपूल माजी सरपंच वैभव गायकवाड, राजहंस चेअरमन मधुकर सोरटे ,मुरूम माजी सरपंच प्रदीप कणसे, सरपंच अशोक चौधरी नितीन सोरटे,शिवाजी शेंडकर, प्रदीप शेंडकर, निरा मार्केट कमिटी संचालक बाळासाहेब शिंदे,सोमेश्वर देवस्थान चेअरमन प्रताप भांडवलकर ,सचिव संतोष भांडवलकर ,आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,कार्याध्यक्ष नितीन शेंडकर, पत्रकार विनोद गोलांडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते,
आयोजित रक्तदान शिबिरास युवक वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले यामध्ये अक्षय ब्लड बँक पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच ८३ बाटल्या रक्त संकलन झाले व सर्व रक्तदात्यांचे आभार श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी मानले.