भारतीय पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईत बैठक संपन्न.
वाढत्या विस्तारीकरणामुळे संघाचे विभाजन : २२ राज्यातून दोन विभाग प्रस्थापित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
बारामती प्रतिनिधी : देशातील सुमारे २२ राज्यात कार्यान्वित असलेल्या भारतीय पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची वार्षिक बैठक मुंबईतील अंधेरीच्या कंट्री क्लबमध्ये उत्साहात संपन्न झाली.
यावेळी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत देशातील विविध राज्यांतून भारतीय पत्रकार संघाच्या वाढत्या विस्तारीकरणासह पत्रकारांची संख्या लक्षात घेता भारतीय पत्रकार संघाचे विभाजन करून २२ राज्यांमध्ये दोन विभाग प्रस्थापित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये ११ राज्यांसाठी मुंबईचे एम. एस. शेख तर उर्वरित ११राज्यांसाठी आसामचे किरण गोगोई यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दरम्यान आसामचे किरण गोगोई यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ११ राज्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कोलकत्ता येथे लवकरच घेणार असल्याची घोषणा देखील केली.
यावेळी महाराष्ट्रासह हरियाणा, गुजरात, आसाम, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आदी राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल "रचनात्मक पत्रकार पुरस्कार तसेच सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र" देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच सर्वानुमते राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रवक्ता, सचिव, महासचिव, लीगल विंग, महिला विंग विभागाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील करण्यात आल्याने पत्रकार संघाच्या पदाधिकारी वर्गात सकारात्मक व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांनी पत्रकारांसाठी संघामार्फत विविध कल्याणकारी योजनांचा उलगडा करून पत्रकारांनाही संविधानात्मक दर्जा मिळायला हवा यासाठी केंद्र शासनाकडे मागणी व त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष अजीजुद्दीन शेख, सचिव सुभाष पांडे, महासचिव मनोहर मंडलोई, तसेच संदीप जैन, ध्रुव सिंह, रंजिता शर्मा, दीपा भारद्वाज,
यांच्यासह लिगल विंगचे प्रदेश अध्यक्ष कैलास पठारे, प्रदेश संघटक अनिल सोनवणे, विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ,
पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख, गोपाल मारवाडी, निर्मल सोलंकी,आदी मान्यवर उपस्थित होते.