राजवर्धनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत प्राथमिक उपचारासाठी मोफतऔषधे वाटप
सोमेश्वरनगर - सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक राजवर्धन दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो या भावनेतून करंजे पूल येथील युवा उद्योजक स्वप्नील गायकवाड यांनी आपल्या परिसरातील शंभर ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी मोफत औषधे वाटप कार्यक्रम ठेवला होता..यावेळी चेअरमन पुरुषोत्तम जगताप, संचालक ऋषिकेश गायकवाड, वि. का. सोसायटी चे चेअरमन कृणाल गायकवाड, मा. सरपंच वैभव गायकवाड, उपसरपंच प्रवीण गायकवाड, मंगेश गायकवाड, माजी उपसरपंच निलेश गायकवाड, वाघळवाडी चे सरपंच हेमंत गायकवाड, सुहास गायकवाड, तुषार सकुंडे, हरिष गायकवाड, राजेंद्र गायकवाड, गणेश शिंदे, पत्रकार विनोद गोलांडे, सचिन पवार यावेळी उपस्थित होते. अशा उपक्रमातून गोरगरीब जनतेची सेवा होते व गरजूना लाभ मिळतो, स्वप्नील गायकवाड यांच्या या उपक्रमाचा इतर युवकांनी आदर्श घ्यावा असा आहे असे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी प्रतिपादन केले.