ओ.बी.सी. सेवा संघाच्या गटप्रमुख पदी हरीश दुबळे यांची निवड
वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ
अखिल भारतीय ओ.बी. सी. सेवा संघाच्या पुरंदर तालुक्यातील नीरा कोळविहिरे गटाच्या अध्यक्षपदी हरीश दुबळे यांची निवड करण्यात आली आहे.
वाल्हे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी हरीश दुबळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असताना त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊनच त्यांना अखिल भारतीय ओ.बी.सी. सेवा संघाच्या नीरा कोळविहिरे गटाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती ओ. बी.सी.सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग भुजबळ यांनी दिली.
यावेळी चौफुला येथील कार्यक्रमात ओबीसी सेवा संघाचे कार्याध्यक्ष नानासाहेब टेंगले यांच्या हस्ते हरीश दुबळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले .
याप्रसंगी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या राज्य महिला आघाडीच्या प्रसिद्धीप्रमुख कादंबरी नलावडे पुणे शहराध्यक्ष शोभा झिंगाडे सरचिटणीस जयश्री तांबोळी संघटक संतोष राऊत तसेच सारिका शिंदे सोमनाथ शिंदे नंदिनी गायकवाड वासंती राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.