Type Here to Get Search Results !

Crime news सुपा पोलिसांनी ट्रकची टायर चोरी करणारी दोन चोर केले जेरबंद

Crime news  सुपा पोलिसांनी ट्रकची टायर चोरी करणारी दोन चोर केले जेरबंद
सुपा प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील मोरगाव ते सुपा रोड वरती शनिवार  ३ रोजी टाकळवस्ती भोंडेवाडी गावचे हद्दीत शिवशंभू बॉडी बिल्डर गॅरेज समोरील मोकळ्या जागेत उभा केलेली टाटा कंपनीची ३५/१८35 मॉडेलची १४ टायर  ट्रक नंबर MH 12 FZ 6651 या गाडीचे पाच काळा रंगाचे डिस्क सोबत असलेले टायर व दोन लाल रंगाच्या एक्साइड कंपनीच्या इलेक्ट्रिकल बॅटरी कोणीतरी अज्ञात इसमानी चोरून नेल्याबाबत सुपा पोलीस स्टेशन येथे तक्रारदार नामे आबा शंकर भोसले राहणार राजबाग काळखैरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली. सदरची तक्रार प्राप्त होतात सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सदर गुन्ह्याची उकल करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय बातमीदाराच्या व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने सदर संशयत दोन  इसम व एक ट्रक ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता यातील संशयत इसम नामे 
१. ओंकार सचिन पवार, वय २० वर्ष, 
२. गौरव दत्तात्रय पवार, वय २२ वर्षे दोन्ही राहणार रोमनवाडी पांडेश्वर तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. वरील नमूद आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले पाच डिस्क व टायर असे एकूण 1,50,000/-रुपये व गुन्ह्यात वापरलेला ट्रक MH अंदाजे किंमत 10,00,000/-रुपये असा एकूण 11,50,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आला.

सुपा पोलीस यांच्याकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्व ग्रामपंचायत यांनी मुख्य रस्ते, चौक, मंदिर व हायवे वरील सर्व आस्थापना यांनी सुरक्षेतेच्या दृष्टीने व मालमत्ताविषयक गुन्हे कमी करण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय  पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती  संजय जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग  सुदर्शन राठोड , श्रीकांत पाडूळे साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीनेश कोळी,  पोहवा राहुल भाग्यवंत, गावडे,  पोलीस नाईक अशोक गजरे , पोलीस अंमलदार किसन ताडगे,महादेव  साळुंखे , तुषार जैनक, संतोष जावीर व नेहाल वनवे यांनी मिळून केली.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test