Type Here to Get Search Results !

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ''पुस्तक प्रदर्शन व पुस्तक विक्री'उपक्रम.

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ''पुस्तक प्रदर्शन व पुस्तक विक्री' उपक्रम. 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वनगर येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'पुस्तक प्रदर्शन व पुस्तक विक्री' उपक्रम पार पडला. यासोबतच भारुड, प्रश्नमंजुषा, कथाकथन, अभंगगायन असे आगळेवेगळे उपक्रमही पार पडले. 
    पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन  व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक पी. बी. जगताप यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने धनंजय गायकवाड यांनी 'आवातणं' या ग्रामीण कथेचे कथाकथन सादर केले. आठवीच्या मुलींनी 'शिकायला जाणार मी शिकायला जाणार' हे भारुड सादर केले तर पाचवीच्या समूहाने "सुंदरतेचे ध्यान सुपाएवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान" या अभंगाचे गायन केले. पर्यवेक्षक आर. बी. नलावडे यांनी प्रश्नमंजुषा उपक्रमाद्वारे काव्यप्रकार, लेखकांची व पुस्तकांची नावे, हुमाण, गवळण अशा सामान्य ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली आणि विजेत्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली. या विद्यालयातील सर्व मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा या कार्यक्रमा प्रसंगी सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन मनीषा खोमणे व सुजाता जगताप यांनी केले. आभार राजेंद्र झुरंगे यांनी मानले.
दरम्यान साहित्याच्या दीड हजार पुस्तकांचे प्रदर्शन भारत ज्ञान विज्ञान समुदाय या संघटनेच्या सहकार्याने आयोजित केले होते. दिवसभर मुलांनी पुस्तके कुतूहलाने चाळली आणि आवडीची पुस्तके खरेदीही केली. राजू बडदे, राणी शेंडकर लता रिठे, सुभाष तिटकारे यांनी 'पुस्तक प्रदर्शन व विक्री' या उपक्रमाचे नियोजन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test