बारामती ! टी.सी.कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कोल्हापुर येथे समाजप्रबोधन
बारामती प्रतिनिधी
अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे, तुळाजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील सांस्कृतिक विभागाची शैक्षणिक सहलीचे ऐतिहासिक कलांचा वारसा असणाऱ्या कोल्हापूर येथे आयोजन केले होते. फक्त सहल न करता तेथील लोकांचे समाज प्रबोधन करावे आपले संस्कृती, पारंपरिक कलाप्रकार जोपासले गेले पाहिजेत अशी प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांची संकल्पना होती म्हणून “महाराष्ट्राची संस्कृती” या पथनाट्यद्वारे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच लोककलेचे अनेक दाखले देऊन पथनाट्यद्वारे समाजप्रबोधन करून विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील नागरिकांची मने जिंकली. कीर्तन, प्रवचन, भारुड, गोंधळ,पोवाडा यांच्याद्वारे कशा पद्धतीने समाज प्रबोधन केले जाते याचे दर्शन दाखवले. लोकांच्या आग्रहास्तव अनेक ठिकाणी पथनाट्याचे पुन्हा पुन्हा सादरीकरण करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शन संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. भिमराव तोरणे, लेखक सोमनाथ कदम व संवाद प्रा.राजेंद्र कंडरे, विद्यापीठ प्रतिनिधी सौरभ पांढरे यांनी लिहिले होते.अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) , सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर ), रजिस्टार अभिनंदन शहा, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर, डॉ. योगिनी मुळे यांनी सांस्कृतिक विभागाचे व विद्यार्थांचे कौतुक केलें.