सोमेश्वरनगर ! सोमेश्वर विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
समाजाने विज्ञानाची कास धरावी व वैज्ञानिक पैलू जोपसावेत यासाठी थोर भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
याचेच औचित्य साधून सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालयामध्ये विविध उपक्रम आयोजित केले होते. विद्यालयात विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित गीते, नृत्य, घोषवाक्य व नाटिका यांचे उत्तम सादरीकरण केले. सहावीतील तन्मय भोसले या विद्यार्थ्याने साकारलेली न्यूटनची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
पर्यवेक्षक नलवडे सर व विज्ञान विषय शिक्षिका जगदाळे मॅडम यांच्या विज्ञान विषयक कोड्यांनी विद्यार्थ्यांना बोलते केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पी.बी जगताप, पर्यवेक्षक आर.बी. नलवडे कार्यालयीन अधीक्षक वाबळे सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश डोंबाळे यांनी केले तर प्रास्ताविक सौ. एम.जी जगताप यांनी केले आणि आभार आर.व्ही होळकर यांनी मानले. रासकर व्ही. आर. तसेच शिंदे पी. व्ही.आदी विज्ञान शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.