ऊस ट्रॅक्टरची ऑइल टाकी फुटल्याने रस्त्यावर ऑइल सांडून अनेक जण दुचाकीस्वार घसरले; नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील दुर्घटना टळली
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील सोमेश्वर मंदिर रोड वर करंजेपुल- गायकवाड वस्ती रस्त्यावर ऊसतोड ट्रॅक्टर वाहन ऑइल ची टाकी फुटल्याने 200 मीटर अंतर ऑइल सांडले , तरीसुद्धा ट्रॅक्टर स्वार थांबून पाहिले नाही वेळेतच करंजे सरपंच भाऊसो हुंबरे व करंजेपुल माजी सरपंच वैभव गायकवाड यांनी ऊसतोड ट्रॅक्टर वाहन चालकास थांबवत त्याला जाब विचारत सांडलेल्या ऑइलवर त्या चालकाकडून मातीच्या साह्याने दुचाकी घसरू नये म्हणून माती त्याच्या वर टाकली व त्यांनी सुद्धा स्वतः त्यांच्यासोबत होणारी दुर्घटना टाळण्यासाठी त्यांनी सुद्धा सामाजिक कार्य केले त्यामुळे उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले अनेक दुचाकी स्वार अपघात टाळला आहे यामध्ये या अगोदर एक नागरिक शालेय विद्यार्थ्यांना दुचाकी वर जात असताना सांडलेल्या ऑइलवरून जोराचा घसरल्याने त्याला जबर मार लागला आहे तरी त्याला उपचारासाठी करंजेपूल येथील खाजगी रुग्णालयात नेले आहे व नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बाळासाहेब शिंदे यांची दुचाकी सुद्धा रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवरून घसरली व त्यांच्या डाव्या हाताला इजा झाली आहे
सध्या सोमेश्वर साखर कारखाना यावर्षीचा गळीत हंगाम चालू आहे ऊसतोड आलेल्या वाहनांनमध्ये ट्रॅक्टर ,ट्रक यांची जादाची भर आहे यामुळे या वाहनांचा व्यवस्थित मेंटनस आहेत का नाही हे सुद्धा चेक करणे गरजेचे आहे नाहीतर असे अपघात होणार असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे