दाैंड तालुका प्रतिनिधी-सुभाष कदम
दाैंड तालुका व श्रीगाेंदा तालुक्याला जाेडणा-या भीमानदीवरील पुलाचे दाेन भीम काेसळले
दाैंड व श्रीगाेंदा या दाेन तालुक्यातील दळणवळणाची साेय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने भीमीनदीवर दाैंड व गार या दाेन गावांच्या दळणवळणाच्या साेयीसुविधांसाठी काेट्यावधी रुपये खर्च करून या पुलाच्या कामाला सुरुवात केलेली आहे.काम अजूनही अर्धवट स्थितीत असतानाच आज ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास जाेराचा वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली.याच वेळी भीमानदीवरील पुलाचे दाेन भीम व क्रेन काेसळले.
मात्र यावेळी काेणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र दाेन भीम व क्रेन चे माेठे नुकसान झाले असल्याची माहिती प्रथमदर्शनींनी सांगितली.एकंदरीत या पुलाच्या चालू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत परिसरात चर्चा चालू आहे.तर या पुलाच्या परिसरातून दाैंड व गार या ठिकाणाच्या प्रवाशांनी पुलाची व रस्त्याची खात्री करूनच परिसरातून प्रवास करावा असेही प्रवाशांना,दुग्धव्यवसायीकांना,शालेय विद्यार्थ्यांना खबरदारी घ्यायला जाणकार मंडळींच्याकडून सांगितले जात आहे.या चालू असलेल्या पुलाच्या कामाच्या दर्जाकडे शासनाने बारकाईने लक्ष देण्याची मागणी परिसरातील प्रवाशी व नागरिकांमधून पुढे आली आहे.