शिरापूर-सिध्दटेक येथे काेरडे पडलेले भीमानदीचे पात्र.
दाैंड तालुका प्रतिनिधी - सुभाष कदम
दाैंड तालुक्याच्या पूर्व भागात भीमानदी पात्र काेरडे ठाक शेतकरी हवालदिल ऐन उन्हाळ्यात फेब्रुवारी महिन्यातचदेऊळगावराजे,वडगादरेकर,पेडगाव,शिरापूर,हिंगणीबेर्डी,मलठण, नायगाव,वाटलूज या ठिकाणचे भीमानदीचे पात्र काेरडे पडल्यामुळे शेतक-यांच्या शेतातील उभी पिके जळून चाललेली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
भीमा आसखेड धरणातून सुमारे २८ दिवस पाणी साेडण्यात आले मात्र नियाेजनाच्या अभावामुळे साेडलेले पाणी पुर्वीच्या पाणीसाठा असलेल्या बंधा-यामध्येच हे पाणी अडून राहिले.तसेच नदी पात्राच्या परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्याचे नियाेजनच चुकल्याने पाण्याची ज्या भागाला खरी गरज हाेती त्या गावांना पाणी पाेहचलेच नाही.त्यामुळे विहीरी व बाेरवेल ही बंद पडलेले आहेत.त्यामुळे शेतक-यांनी राजकीय नेत्यांना पाणी साेडण्याची केलेली विनंती लाेकसभेच्या निवडणूकीच्या आचारसंहितेचे कारण देत राजकीय नेतेमंडळींनी शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
एकंदरीत मार्च ते मे महिन्यांममधील कडक उन्हाच्या तिव्रतेमुळे पिकांचे माेठे नकसान झाल्याने शेतक-यांचे कंबरडे माेडल्याची शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे.आता पाऊस पडल्याशिवाय शेतक-यांचा पाणी प्रश्न सुटणार नाही असे चित्र पहायला मिळत आहे.