Type Here to Get Search Results !

पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय दहावीचा निकाल १००%

पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय दहावीचा निकाल १००%
इंदापूर (दि.२७)-: दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी निरवांगी संचलित पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. हनमंतराव पोळ, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव पांडुरंग पाटील, संस्थेचे सर्व विश्वस्त विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी 
प्रथम कु. किसवे त्रिशा तानाजी - ९४.४०%, द्वितीय कु. नांगरे अर्चना दत्तात्रेय ९२.४०% व बोराटे राजनंदनी आप्पासो ९२.४०, तर तृतीय क्र काळे वैष्णवी विष्णू ९२.२०%  याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक शिरसट के. एच. यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test