सोमेश्वर एसटी कॅन्टीन हॉटेल व्यावसाईक वाघमारे यांची कन्या 'तन्वी वाघमारे' ही सोमेश्वर विद्यालयात पहिली...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-
बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान), सोमेश्वरनगर...
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस . एस . सी .परीक्षा मार्च २०२४ निकाल जाहीर झाला आहे
सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या विद्यालयाचा निकाल ९७.६७% लागला तर भाग शाळा करंजे या विद्यालयाला ९५.८३% गुण मिळाले.
सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर येथील विद्यार्थी नी कु.तन्वी दत्तात्रय वाघमारे हिला ९६ टक्के मार्क मिळवत यश संपादन केले आहे, तन्वी चे वडील दत्ता वाघमारे हे एक हॉटेल व्यावसाईक आहे आई पुनम दत्तात्रय वाघमारे शिक्षक बी कॉम डी एड B.Com,D ED असल्याने अभ्यासाकडे सातत्याने लक्ष व तिच्याही शिक्षणाचा फायदा तसेच वेळोवेळी शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच मला हे यश मिळाले असल्याचे बोलताना तन्वी म्हणाली
तन्वी हिने नेत्रदीप यश संपादन केले असल्याने सोमेश्वरनगर करंजेपुल येथील सर्वच मित्रपरिवारच्या वतीने तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे
सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या शेळेतील पहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे
१. कु. वाघमारे तन्वी दत्तात्रय
२. चि. जगताप पथमेश सचिन
३ . चि. खैरे मयुरे श्वर दत्तात्रय
विद्यालयाच्या वतीने यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या.