सोमेश्वर हायस्कुल मध्ये सन १९९८-९९ बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा तब्बल २५ वर्ष्यानी संपन्न.
अनावश्यक खर्च टाळत शाळा परिसर सुशोभीकरणासाठी थोड्या दिवसातच वृक्षारोपण करणार.
"आवडते मज मनापासुनी शाळा,
लाविते लळा जशी माऊली बाळा"..!
सोमेश्वरनगर - शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीर बारामतीतील सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर इयत्ता दहावी इ. सन १९९८-९९ बॅच स्नेह मेळावा तब्बल २५ वर्ष्यानी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत शिक्षक व बॅचमधील माजी विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व माजी विद्यार्थी मेळाव्यास सुरुवात केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी शिक्षण व कर्मचारी वृंद होते. कार्यक्रमांमध्ये इ.सन १९९८-९९ बॅचमधील उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगतात तुमच्या मुळे आम्ही घडलो... हे मान्य करत दर वर्षी आमच्या बॅचचा सोमेश्वर हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळावा घेत आपणा सर्वांना बोलवत सन्मान करणे आमचे कर्तव्य समजत आहे व शाळा परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवणार आहे या वर्षीपासून शाळा परिसरात पुढील काही दिवसात चागल्या प्ररतीच्या झाडांचे वृक्षारोपण करणार आहोत असे बोलताना मनोगतात सांगितले तसेच उपस्थित शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.
बॅचमधील विद्यार्थीनी निवडलेल्या आपल्या क्षेत्रात नावलौकीक मिळवत असल्याचा आम्हाला अभिमान आहे असे कार्यक्रम प्रसंगी बोलताना शिक्षक म्हणाले त्यांनां पुढील काळात चांगली प्रगती होवो असा शब्द रुपी आशिर्वाद दिला तर बॅचमधील विद्यार्थी शिक्षक, इंजिनीयर, सैनिक, पोलीस, सामाजिक, राजकीय, शेती आणि दुग्ध तसेच सिविल कॉन्ट्रॅक्टर, उद्योजक, अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मैत्री जपा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असा मोलाच संदेशही यावेळी दिला.
यावेळी कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . बॅच च्या वतीने सर्व शिक्षक गुरुजनांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह भेट देऊन सन्मान केला तसेच शाळेच्या वतीने देखील उपस्थित शिक्षकांनी आभार मानत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.