Type Here to Get Search Results !

तैनुर शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्रदान

तैनुर शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्रदान
बारामती: पुणे येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या सूर्योदय प्रतिष्ठानच्या वतीने सा.वतन की लकीर वृत्तपत्राचे संपादक तैनुर शफिर शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
  श्री छत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय व बालक मंदिर कोंढवा बुद्रुक पुणे याठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे भाजपा कामगार जिल्हा उपाध्यक्ष किशोर अहिरे होते.
  यावेळी सूर्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, यशदाचे माध्यम व प्रकाशन केंद्र विभाग प्रमुख डॉ.बबन जोगदंड, पद्मावती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय दगडे,  माजी नगरसेविका संगीता ठोसर, भारती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, मा.आमदार योगेश टीळेकर, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पिंपरी चिंचवड पुणे खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. 
  यावेळी डॉ.बबन जोगदंड, किशोर अहिरे यांनी सूर्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभाताई पाटील करीत असलेल्या कामाचे कौतुक केले. पुरस्कार मिळालेल्यांचे आभार मानले. यावेळी विविध स्तरातील मान्यवर, सूर्योदय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
  याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून कोळी नटसम्राट, कज्ञोळीगीत कार व नृत्यदिग्दर्शक राजेश खर्डे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन खटावकर यांनी केले तर पत्रकार नरेश टाटिया यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test