आंबी येथील सोमेश्वर विद्यालयात शाहू महाराज जयंती साजरी
राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून आंबी येथील सोमेश्वर विद्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यालयातील शिक्षक संतोष जेधे यांनी शाहू महाराज यांच्या विषयी माहिती सांगितली. तर हेमंत गडकरी यांनी शाहू महाराज यांचे शैक्षणिक, सामाजिक, आरक्षण विषयक योगदान विशद केले. यावेळी बाळू बालगुडे, महेंद्र कुतवळ, सोमनाथ डगळे, मोहन पवार व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.