जिल्हा परिषद शाळेत जागतिक योगदिन उत्साहात संपन्न
वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव नं.१ आणि वडगाव नं.२ शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त प्रसिद्ध योगअभ्यासक लखनभैया सुतार आणि वाणेवाडीचे योगअभ्यासक नितीनभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी अर्धशलभासन, पूर्णशलभासन,भुजंगासन,सर्वांगासन धनूरासन,नौकासन,पर्वतासन,पद्मासन योगमुद्रा प्राणायाम,बस्तीका प्राणायाम,सूर्यनमस्कार,मेडिटेशन आणि ध्यानसाधना घेण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय मन लावून योगासने केली.
यामध्ये शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला.पालकांनी भाग घेतला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जाधव,अरुणा आगम , उपशिक्षिका सुरेखा मगदूम,सुनिता पवार,लता लोणकर,मालन बोडरे,राणी ताकवले,विजया दगडे आणि उपशिक्षक अनिल गवळी उपस्थित होते.