'सोमेश्वर' भागात बाजरी पेरणीला सुरुवात.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :- जून महिना सुरू होऊन जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले आहेत. जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने सोमेश्वरनगर परिसरात वेळेवर बाजरी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. बारामती तालुक्यात पश्चिम पट्टा हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्र असल्याने ऊस बागायत पट्टा म्हणून ओळखला जात असला तरी युवा शेतकरी तरकारी पिका पिका कडे वळलेले दिसत आहे, या अनुषंगाने काही शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पध्दतीने म्हणजे ट्रॅक्टर च्या सहाय्याने बाजरी या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. एका एकरला बाजरी पेरणीस तीन हजार च्या आसपास खर्च येत असल्याचे हनुमंत शेंडकर यांनी सांगितले तर यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकऱ्यांनी बाजरी पीक पेरणी तयारी केली. अनेकांनी खते, बियाणांची खरेदी केली आहे. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात बारामती या भागासह इतर अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. प्रामुख्याने बारामती च्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे
.......
शेतात बाजरी पिका साठी ३४५ महाधन बाजरी वाण ची शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे तसेच यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याने बाजरी पीक जोमात येईल व अधिकचा आर्थिक फायदा होणार असल्याचे शेतकरी परसराम शेंडकर यांनी बोलताना सांगितले.