आठवडा बाजारातील चोरट्यांनो सावधान.... पोलिसांची असणार करडी नजर...
सोमेश्वरनगर - आठवड्या बाजारातील चोरट्यांनो सावधान रहा कारण पोलिसांची राहणार तुमच्यावर करडी नजर बारामतीतील करंजेपुल येथे मंगळवारी असणारे आठवड्या बाजार तसेच शुक्रवारी असलेल्या वाणेवाडी येथील आठवडे बाजार मध्ये वारंवार मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे व पोलीस अधिकारी यांच्या मंगळवारच्या आठवडे बाजारात पहारा ठेवत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.