दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम
सिध्देश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांचे विद्यालयात सवाद्य स्वागत करण्यात आले.
दाैंड तालुक्याच्या पूर्व भागात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या सिध्देश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार,उपाध्यक्ष आनंदराव गिरमकर,सचिव हरिश्चंद्र ठाेंबरे, खजिनदार संदिपशेठ नय्यर,सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ - २०२५ या वर्षी संस्थेच्या सिध्देश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे
सचिव हरिश्चंद्र ठाेबरे, देऊळगाव राजेच्या केंद्र प्रमुख जानराव मॅडम,विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी वर्ग,व माेठया संखेने पालक वर्ग उपस्थित हाेते.नंतर विद्यालयाच्या मंचावरती विद्यार्थ्यांना पालकांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या आगळेवेगळ्या स्वागताने भारावून गेलेल्या विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त करुन संस्थेच्या या उपक्रमाबाबत परिसरातून काैतुक केले जात आहे.