सोमेश्वरनगर - अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व मु.सा. काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'अमली पदार्थ विरोधी अभियान' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, पोलीस हवालदार नागटिळक साहेब,अमोल भोसले साहेब, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या जयश्री सणस यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये पाहुण्यांचे स्वागत करून, विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. कारण आज भारत हा तरुणांचा देश म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे या युवा पिढीवरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे आणि त्यांनी आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये व्यसनापासून अलिप्त राहून स्वतःची प्रगती केली पाहिजे, तरच कुटुंब, समाज व एकंदरीत देशाची प्रगती होणार आहे असे विचार व्यक्त केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक कन्हेरे साहेब यांनी अमली पदार्थ विरोधी जनजागृती करत असताना अमली पदार्थामुळे तरुण पिढीचे होणारे नुकसान व त्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि त्याच्याशी निगडित शिक्षा व कायदे याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पर्यवेक्षक प्रा.राहुल गोलांदे यांनी मानले.