विविध सुरक्षिततेसाठी मानव अधिकार संरक्षण समिती वतीने श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टला निवेदन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-
बारामती तालुक्यातील करंजे येथे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर आहे. महाशिवरात्र व श्रावण महिन्यात महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराष्ट्रातूनही शिवभक्त सोमेश्वर शिवलिंग दर्शन घेण्यासाठी येत असतात असे असताना सोमेश्वर मंदिर परिसरातील विविध सुरक्षितेचे प्रश्न मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांच्याकडे शिवभक्तांनी मांडले असता या विषयाला अनुसरून मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य गजानन भगत व पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव व पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीत विनंतीपूर्व निवेदन सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत मोकाशी व उपस्थित विश्वस्त यांना सोमवार दि १५ रोजी देण्यात आले तसेच दिलेल्या निवेदनातील शिवभक्तांच्या गैरसोयी लवकरात लवकर दूर कराव्या असे ही आवाहन देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे मानव अधिकार समिती यांनी केले तर असेच सदर निवेदन काही दिवसातच आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , धर्मादाय कार्यालय,पुणे तसेच बारामती प्रांताधिकारी व तहसीलदार यांना लवकरच देणार आहोत असेही मानव अधिकार समितीने बोलताना सांगितले.
∆ चौकट....
मानवधिकार समिती ही नेहमीच हक्क, अन्याय व सुरक्षिततेबाबत तत्पर असते व यापुढेही राहणार आहे दिलेल्या निवेदनाची दखल घेत विविध सुरक्षितेविषयी कामे मार्गी लावावीत.
जनसंपर्क अधिकारी,महाराष्ट्र राज्य गजानन भगत व पुणे जिल्हाध्यक्ष नागेश जाधव
∆ चौकट.........
सोमेश्वर मंदिर व परिसरातील विविध सुरक्षिततेबाबत दिलेल्या निवेदनाची लवकरच दखल घेतली जाईल व सुरक्षितेचा शिवभक्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न याची सर्व विश्वस्त मंडळ निर्णय घेईल व येणाऱ्या शिवभक्तांना सुरक्षितता व नाहक त्रास न होण्याची काळजी ही आम्ही घेऊ.
श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट - अध्यक्ष अनंत मोकाशी.