निरा देवघर धरण ९४.२३ टक्के, भाटघर धरण ९८.६८ टक्के तर गुंजवणी धरण ८६ टक्के भरले तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू
वीर धरणाच्या सांडव्यातून २३ हजार १८५ क्युसेक विसर्ग सुरू
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी ५७९.४८ मीटर झाली आहे. तसेच धरणाच्यावरील भागातील निरा देवघर धरण ९४.२३ टक्के, भाटघर धरण ९८.६८ टक्के तर गुंजवणी धरण ८६ टक्के भरलेली असल्याने या तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेला १३ हजार ९११ क्युसेक विसर्गात वाढ करुन तो आता २३ हजार १८५ क्युसेक करण्यात आला आहे.पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी- -कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण