करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर रस्तावरील... त्या खड्ड्यामुळे होतं आहेत अपघात.
सोमेश्वरनगर - सोरटी सोमनाथाचे प्रति रूप मानले जाणारे श्री सोमेश्वर मंदिर करंजे हे देवस्थान आहे , सोमवार दिनांक ५ रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे . ही यात्रा महिनाभर असून विविध जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त सोमेश्वर शिवलिंग दर्शन घेण्यासाठी येत असतात . निरा रस्त्यालगत करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर अवघे चार किलोमीटर अंतर आहे तसेच पुढील एक महिना सोमेश्वर शिवभक्तांची मोठी गर्दी राहणार आहे.याच रस्त्यावर करंजेपुल नजिक सततच्या पावसामुळे जीवघेणे मोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामध्ये अनेक दुचाकी पुरुष महिला तसेच शालेय विद्यार्थी खड्ड्याचा अंदाज न आल्याने पडले आहे व दुखापतही झाली असल्याचे स्थानिक व्यावसायिक यांनी सांगितले तसेच. सोमेश्वरनगर करंजेपुल आठवडे बाजार मंगळवारी असल्याने व शिक्षण संकुल व मोठी बाजारपेठ असल्याने चौधरवाडी,भापकरमळा,माळवाडी,देऊळवाडी,जोशीवाडी,रासकरमळा,मागरवाडी,करंजे येथील विध्यार्थ्यांचे व नागरिकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो आहे. पुढील अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने यावर त्वरित लक्ष देत ते लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी प्रवाशांसह ग्रामस्थ विद्यार्थी पालक-नागरिक व पंचक्रोशीतील सोमेश्वर भाविकांनी केली आहे.