बारामतीतील हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.
बारामती - बारामतीतील हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गुरुवार,दि. २९ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या कु.निशा पांड्या (राष्ट्रीय खेळाडू) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शालेय जीवन व मैदानी खेळ यांचे सुंदर नाते त्यांनी विद्यार्थ्यांना समजावले. तसेच खेळाचे महत्त्व पटवून दिले. शाळेचा हेड बॉय चि. चैतन्य बिचकुले याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर हेड गर्ल कु. तनिष्का गावडे हिने मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील प्रसंग सांगत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेत इ.१ली ते १०वी च्या विद्यार्थ्यांची धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सूत्रे शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.अमित गावडे सर व इ.१०वी चे विद्यार्थी चि.असद शेख, चि.वरद रड्डे, चि.पारस पटेल, चि.ओंकार मिसाळ यांनी सांभाळली.
आजचा कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी सर, मएसो नियामक मंडळ सदस्य मा.श्री. राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री. पी.बी. कुलकर्णी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.