राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी पहाटे ००.१० वाजल्यापासून ते रात्री २४.०० वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे