Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
 
सोमेश्वरनगर :- सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन २८ व २९ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. क्रीडास्पर्धांचे उ‌द्घाटन संस्थेचे सचिव श्री. सतिश लकडे यांच्या शुभ हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयामध्ये विदयार्थ्यांना खेळाच्या जास्तीत जास्त सुविधा पुरविल्या जातील तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकाने दररोज एक तास व्यायाम केला पाहिजे व स्वस्थ भारत घडविण्यासाठी विशेष योगदान दिले पाहिजे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो त्याचबरोबर नोकरीमध्ये उच्चपदावर चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे सर्वांनी खेळ, आरोग्य शारीरिक शिक्षण याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे या स्पर्धेमध्ये ३००पेक्षा अधिक खेळाडू मुलामुलींनी सहभाग नोंदविला क्रीडा स्पर्धामध्ये इनडोअर रस्सीखेच, बुद्धिबळ, मनोरंजक खेळामध्ये दोरी उड्या , प्लांक चॅलेंजेस तसेच मैदानी स्पर्धेमध्ये क्रिकेट, सांघिक खेळांबरोबर ५कि.मी. धावणे क्रॉसकंट्री स्पर्धा तसेच १०० मीटर धावणे अशा विविध स्पर्धाबरोबर योगाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे -
५ कि.मी धावणे मुले :-सुजल सावंत-प्रथम विशाल भोसले -द्वितीय ५ कि.मी धावणे मुली:- पायल लकडे -प्रथम 
 संजना जाधव -द्वितीय
दोरी उड्या मुले :-
 सौरभ अहीवले- प्रथम 
यश गायकवाड -द्वितीय
दोरी उड्या मुली:-
पुजा चव्हान-प्रथम
वैष्णवी आवटे-द्वितीय
योगा मुले:-
पार्थ साळवे- प्रथम 
संकेत साळवे-द्वितीय
१००मीटर धावणे मुले:-
विशाल बामणे- प्रथम,
निखील हगवणे -द्वितीय
१०० मीटर धावणे मुली:-
 संगीता तोरवे- प्रथम 
सोनाली निकम- द्वितीय
प्लांक चॅलेंजेस मुले:-
सुजल सावंत- प्रथम
 कुणाल नलवडे द्वितीय
प्लॅक चलेंजेस मुली :-
 वैष्णवी आवटे- प्रथम 
 ऐश्वर्या होळकर-द्वितीय
या वैयक्तीक क्रीडा प्रकाराबरोबर व्हॉलीबॉल,क्रिकेट, रस्सीखेच अश्या सांघीक प्रकारामध्ये विदयार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. पारितोषिक वितरण समारंभ २९ ऑगस्ट रोजी पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जुब्लीएंट कंपनीचे मानव संसाधन प्रमुख ,कंपनीचे हेड पंचभार श्री. दिपक सोनटक्के यांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंचा मेडल देऊन गौरव करण्यात आला. सर्व खेळांमधून सांघिक विजेतेपद -(प्रथम वर्ष कला) च्या विद्यार्थ्यांनी ४२ गुण घेऊन मेजर ध्यानचंद ट्रॉफी मिळवली. उपविजेतेपद- (द्वितीय वर्ष वाणिज्य) या वर्गाला मिळाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ . जवाहर चौधरी उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, उपप्राचार्या डॉ.जया कदम, उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे-देशमुख, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. संजू जाधव, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. निलेश आढाव, प्रा.गोरख काळे,प्रा. अनिकेत भोसले, डॉ. कल्याणी जगताप, प्रा. शिल्पा कांबळे, प्रा.चेतना तावरे, प्रा. रजनीकांत गायकवाड उपप्राचार्य बीसीए, कर्मचारी आदित्य लकडे,शुभम येळे , विकास बनसोडे , प्रफुल्ल काकडे विद्यार्थी राहुल मसुगडे , कृष्णा काळे, समाधान शिंदे. प्रा. रविंद्र होळकर, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा.जयश्री सनस यांचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व वरीष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापकांनी स्पर्धा स्थळी भेट देऊन खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. डॉ. बाळासाहेब मरगजे व प्रा. दत्तराज जगताप यांनी जिमखाना विभागाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष श्री अभिजीत भैय्या काकडे-देशमुख यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test