सोमायच्या करंजेला येत विविध जिल्ह्यातील शिवभक्तांनी घेतले "श्री सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग"दर्शन
सोमेश्वरनगर - बारामतीतील पुणे पासून ८० किलोमीटर, सातारा १०० किलोमीटर तर बारामती पासून ३२ किलोमीटर अंतरावर असणारे करंजे येथील प्रसिद्ध श्री सोमेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रति सोरटी सोमनाथाचे रूप मानले जाणारे सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग आहे . श्रावण महिना महाशिवरात्र येथे दर्शनासाठी विविध जिल्ह्यातून शिवभक्त भाविक येत असतात श्रावण महिना निमित्त व आज असणाऱ्या दुसरा सोमवार ( दि १२ ) रोजी पावसाने उघडी दिल्याने सकाळपासूनच विविध जिल्ह्यातील शिवभक्तांनी लाखोंच्या संख्येत स्वयंभू शिवलिंग दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगाच्या रांगा लावल्या होत्या. रविवारी मध्यरात्रीची सोमेश्वर शिवलिंग महापूजा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर , चौधरवाडी मा.सरपंच यादवराव शिंदे ,समता पतसंस्थेचे चेअरमन दिलीप फरांदे यांच्या शुभहस्ते पार पडली यावेळी श्री सोमेश्वर देवस्थान अध्यक्ष अनंत मोकाशी , सचिव विपुल भांडवलकर, खजिनदार सचिन भांडवलकर , विश्वस्त मंडळ सह करंजे सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. सोमेश्वर देवालय गाभारा व शिवलिंग पिंड आकर्षक पुष्प सजावट साखरे उद्योग समूह यांच्यामार्फत करण्यात आली तर सकाळची सोमवार उपवासानिमित्त येणाऱ्या शिवभक्तांसाठी खिचडी चे आयोजन हरीष बाळासो गायकवाड , विठ्ठल काशिनाथ गायकवाड , धनंजय दत्तात्रेय गोवेकर यांच्यामार्फत केले तर संध्याकाळचे अन्नदाते तानाजी अण्णासो सोरटे व विक्रम मुकुंदराव काकडे यांनी केले
बारामती आगारा मार्फत यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या होत्या. भाविकांची आरोग्य काळजी साठी होळ आरोग्य केंद्र चे डॉक्टर सह स्टाफ उपस्थित होता, येणाऱ्या दुचाकी चार चाकी वाहनांची प्रशस्त पार्किंगची व्यवस्था तसेच मंदिर परिसरात सर्व सुख सोयी शुद्ध पाणी त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपूल दुरक्षेत्राचे पी एस आय पांडुरंग कान्हेरे यांनी चोख बंदोबस्त तसेच सर्प रुपी महादेव प्रकट झाल्याने दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी ही केली असल्याची माहिती सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी दिली.
सोमेश्वर मंदिर परिसरात विविध दुकाने ,स्टॉल, हॉटेल ,गृपयोगी वस्तू तसेच विविध प्रकारचे छोटे मोठे पाळणे असल्याने मंदिर परिसर गजबजून गेला होता. दिवसभर पाऊसाची उघडीप असल्याने दिवसभर आलेल्यांनी कुटुंबासमवे यात्रेचा आनंद व लहान मुले युवक -युवतींनी पाळण्यात बसण्याचा आनंद घेतला. तर आलेल्या दुकान हॉटेल व्यवसायिक यांचाही गेल्या सोमवारपेक्षा या सोमवारी विक्री जास्त झाल्याने व्यावसायिक आनंदी असल्याचे बाबू गायकवाड यांनी सांगितले.
फोटो ओळ - करंजे येथील श्री सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग (छायाचित्र विनोद गोलांडे )