हे नुकसान लवकरात लवकर भरून काढून ही वास्तू त्याच दिमाखात आणि डौलाने उभी राहणार
कोल्हापूरचे थोर कलावंत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच 'केशवराव भोसले नाट्यगृहाला' लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. हसन मुश्रीफजी, इतर पदाधिकारी व माझे सहकारी यांच्यासह आज मी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. मी कोल्हापूरकरांना सांगू इच्छितो, हे नुकसान लवकरात लवकर भरून काढून ही वास्तू त्याच दिमाखात आणि डौलाने उभी करण्यासाठी माझ्या परीने सर्व प्रयत्न मी करेन !