साथीच्या रोगाचा फैलाव आटोक्यात आणुन जलजन्य व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये यासाठी नगरपंचायत ने खबरदारी व काळजी घ्यावी - कय्युम मुल्ला.
लोणंद शहरातील विविध भागांतील अनेक नागरिक डेंग्यू, मलेरिया आदी साथीचे आजाराने त्रस्त झाले असताना प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे समक्ष भेटून चौकशी केली असता लोणंद नगरपंचायत हद्दीत जुन ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सुमारे 30 हुन अधिक डेंग्यू बाधित रुग्ण आढळून आले असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सुपरवायझर शिवाजी सोनवलकर यांनी प्राथमिक माहिती दिली व याबाबत लोणंद नगरपंचायत ला खबरदारी घेण्यासाठी पत्रांद्वारे जलजन्य व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक विविध उपाय योजना कराव्यात यासाठी मार्गदर्शन सुचना सुचित करुन तसा अहवाल सादर करण्याचे पत्र दिले असलेबाबत सांगितले.
लोणंद शहरात डेंग्यू व साथीचे आजाराने थैमान घातले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र येधील आरोग्य सेवक(MPW) व नगरपंचायत लोणंद चे आरोग्य सेवक (MPW) यांनी एकत्रितपणे लोणंद शहरातील प्रत्येक प्रभागात कंटेनर सर्वे करणे गरजेचे आहे तसेच धुर फवारणी करणे , सांडपाणी वाहून जाणारे गटारींवर जंतु नाशक पावडर टाकणे, वाढलेले गवत कांग्रेस वर तणनाशकाची फवारणी करणे, पिण्याच्या पाण्याचे वॉल आहेत तेथील खड्यांत अथवा वॉल भवती बांधलेल्या छोट्या टाकीत साठलेल्या पाण्यात व शहरातील विविध भागांतील साठलेल्या डबक्यांत गप्पी मासे टाकणे, आईल टाकणे आदी आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. याच बरोबर लोणंद शहरात कचरा गोळा करणारे घंटागाडींवर वाजणारे स्पिकरवर साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठीच्या पार्श्वभूमीवर व्हाईस रेकॉर्डिंग द्वारा योग्य त्या सुचना नागरिक वसाहतींमध्ये देण्यात याव्यात व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लोणंद शहरातील वाढत्या साथीच्या रोगाचा फैलाव आटोक्यात आणुन जलजन्य व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी व काळजी घ्यावी व या व्यतिरिक्त आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे विनंती निवेदन साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी लोणंद नगरपंचायत चे मुख्याधिकारी मा. दत्तात्रय गायकवाड यांना दिले.