करंजे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस निमित्त रक्तदान शिबिर.
सोमेश्वरनगर - विविध जिल्हा तालुका व गावांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस दर वर्षी सामाजिक उपक्रम राबवतच केला जातो या महिन्यातील सोमेश्वर करंजे येथील श्री सोमेश्वराची श्रावणमास यात्रा औचित्य साधत 'रक्तदान हे श्रेष्ठदान' या या संकल्पनेने बारामती तालुक्यातील सोमेश्वर करंजे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले .या रक्तदान शिबिरास युवक युवती तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांनी उस्पुर्त प्रतिसाद दर्शवला अक्षय ब्लड सेंटर , बारामती यांचे सहकार्य लाभले तर या शिबिरामध्ये ६५ बॉटल रक्त संकलन करत अजितदादांना ६५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याची माहिती सरपंच भाऊसो हुंबरे यांनी दिली करंजे सरपंच उपसरपंच व सदस्य व करंजेतील युवा कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच या रक्तदान शिबिराचे उद्घाटन खरेदी विक्री संघ बारामती चेअरमन विक्रम भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी श्री सोमेश्वर सह.साखर कारखाना संचालक लक्ष्मण गोफने,प्रवीण कांबळे, ऋषिकेश गायकवाड तसेच श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे, ज्येष्ठ कैलास मगर,प्रगती बहुउद्येशिय सामाजिक संस्था अध्यक्षा सुचित्रा साळवे ,राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पुणे दादू मांगडे , भारतीय पत्रकार तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे , सामाजिक कार्यकर्ते नितीन सोरटे, भरत हागवणे,दत्ता आबा फरांदे, शिवाजी शेंडकर सह करंजे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य मान्यवर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील युवक नागरिक , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.