श्रावण मास निमित्त सोमेश्वर मंदिर येथे ... ड्रायव्हर चालक-मालक संघटना दरवर्षी करतात अन्नदान ; परिसरातून कौतुक.
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वर करंजे येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे श्रावण मास यात्रा ही एक महिना असते या यात्रेनिमित्त स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या विविध जिल्ह्यातील शिवभक्तांना रविवारी दि १ रोजी महाप्रसादाचे सोमेश्वर येथील ड्रायव्हर चालक-मालक संघटना वतीने करण्यात आले होते "अन्नदान हे श्रेष्ठ दान" असल्याने या उपक्रमात सर्व सोमेश्वर पंचक्रोशीतील ड्रायव्हर चालक-मालक संघटनेतील सर्वच सदस्य मोठ्या आनंदात सामील होत असतात अशी माहिती संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिली तसेच दरवर्षी पवित्र महिना म्हणून मानला जाणारा श्रावण महिना असल्याने व श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर याच परिसरात लाभले असल्याने अन्नदान करत एक सामाजिक उपक्रम ही संघटना दरवर्षी राबवत असते यामुळे या संघटनेचे सोमेश्वर पंचक्रोशीतून नेहमीच कौतुक होत असते
या अन्नदान प्रसंगी सोमेश्वर मंदिर येथे संघटनेतील सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभते.