'माझे शहर हेच माझे घर' अशी प्रशासकीय यंत्रणांनी मानसिकता बाळगून तत्परतेने कार्य केले तर साथीच्या रोग लवकर आटोक्यात येतील - कय्युम मुल्ला
" निवेदनाची दखल घेतले बद्दल नगरपंचायत मुख्याधिकारी व आरोग्य विभागाचे साथ ने मानले आभार
लोणंद - डेंग्यू, मलेरिया आदी साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी साथ प्रतिष्ठाण च्या निवेदनानंतर जलजन्य व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी नगरपंचायत व आरोग्य विभाग या प्रशासकीय यंत्रणा एक्टीव मोड मध्ये येत 14 आशा सेविका, आरोग्य सेवक व नगरपंचायत कर्मचारी वर्ग यांनी आज सोमवार प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथुन आवश्यक साधन सामुग्री घेऊन शहरातील प्रत्येक प्रभागातील घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे सुरू करायला सुरुवात केली तसेच तणनाशकाची व धुराची फवारणी व आवश्यक कार्यवाही यावेळी करण्यात येणार आहे.
लोणंद शहरातील वाढत्या डेंग्यू, मलेरिया आदी साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठीच्या पार्श्वभूमीवर सदर कंटेनर सर्वे करत असताना " माझे शहर माझे घर " अशी मानसिकता बाळगून प्रशासकीय यंत्रणांनी कार्यरत राहत संसर्गजन्य व साथीचे रोग पसरवणारे ॲक्टीव पाँइंट शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करतील तसेच जेवढी प्रशासनाची जबाबदारी तेवढीच नागरिकांची पण आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सहकार्य करावे असे आवाहन साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी करत नगरपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे आभार मानले. यावेळी रामदास तुपे, सदाशिव शेळके आदी नगरपंचायत चे कर्मचारी ,प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सेवक व आशा सेविका बहुसंख्येने उपस्थित होते.