Type Here to Get Search Results !

'समाजसेवा' ग्रुपचा दशकपूर्ती स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न...विविध उपक्रम राबवत असल्याने 'समाजसेवा' व्हाट्सअप ग्रुपची महाराष्ट्रात चर्चा.

'समाजसेवा' ग्रुपचा दशकपूर्ती स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

विविध उपक्रम राबवत असल्याने 'समाजसेवा' व्हाट्सअप ग्रुपची महाराष्ट्रात चर्चा.

सोमेश्वरनगर - बरेच व्यावसायिक, नागरिक ,मित्रपरिवार व्हाट्सअप ग्रुप काढतात व ते ह्या ना त्या कारणाने बंद ही
 होतात काही आपल्या व्यवसाय संबंधित व्हाट्सअप ग्रुप काढतात तर काही ग्रुप मध्ये स्वतःचाच विचार मांडतात असे ग्रुप आपण पाहिले आहे परंतु विविध विचारांचा ग्रुप म्हणून 'समाजसेवा' ग्रुप कडे पाहिले जाते व याचा आदर्श प्रत्येक ग्रुपने घ्यावा.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील 'समाजसेवा' व्हाट्सअप ग्रुपला नुकतेच दहा वर्ष पूर्ण झाल्याने दशकपूर्ती स्नेह मेळावा  ब्रह्मचैतन्य कार्यालय येथे ग्रुपमधील ज्येष्ठ मान्यवर यांच्या हस्ते केक कापत रविवार दि २२ रोजी  मान्यवर सदस्यांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात संपन्न झाला... कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्वांचे स्वागत करत सुगम संगीताने झाली यामध्ये आळंदीकर बंधूंनी गीत सादर केल्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
'समाजसेवा' या व्हाट्सअप ग्रुपने सर्व सदस्यांना बरोबर घेत अनेक समाज उपयोगी उपक्रम तसेच कार्यक्रम आतापर्यंत राबवण्यात आले, आपत्ती  कालीन पूरग्रस्तसह,शिक्षणाची मदत ,रक्तदान शिबिर सारखे उपक्रम तसेच गोर गरीब,वंचितांना या ग्रुप च्या माध्यमातून मदत झाली असून, कोरोना काळातही कोरोनाग्रस्तांना बेड उपलब्ध करून देण्याचे हे कार्य ग्रुपच्या माध्यमातून झाले.
विविध पक्षांचे राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,  प्रशासकीय, उद्योग, व्यापार, शेती, सहकार यासह विविधक्षेत्रातील मान्यवर तसेच  पत्रकार बंधू या ग्रुप मध्ये सदस्य आहेत. ग्रुपमध्ये सर्वच पक्षांचे कार्यकर्ते त्यामध्ये पुरंदर,भोर,बारामती,फलटण,इंदापूर,शिरूर पर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते ,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ,निवृत्त शिक्षक ,विविध संस्थांचे पदाधिकारी मिळून राजकीय चर्चासत्रे या गृप वर घडू लागली यावर कधी विरोध कधी मार्ग निघू लागले यामुळे 'समाजसेवा' ग्रुप चे महत्व वाढतच गेले इतर  व्हाट्सअप ग्रुपने आदर्श घेत ग्रुपच्या माध्यमातून कार्य करावे आयोजित 'समाजसेवा' दशपूर्ती सोहळा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला तर रुचकर जेवणाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली
सूत्रसंचालन संतोष शेंडकर यांनी केले तर मनोगत योगेश  सोळसकर यांनी व्यक मानले ग्रुपमधील उपस्थित सदस्य मान्यवर यांचे आभार'समाजसेवा'ग्रुप ॲडमिन या नात्याने मदन काकडे यांनी मानले.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test