ॲड.प्राजक्ता दिलीप घोलप (मानसशास्त्रज्ञ आणि कायदेशीर सल्लागार) यांना उद्योगरत्न पुरस्कार मिळाला.
रॅायल कारभार प्रस्तुत पुणे बिगेस्त फॅशन शो आणि प्रेझेंटेशन शो स्टार ऑफ महाराष्ट्र 2024 तसेच उद्योग रत्न पुरस्कार सोहळा 2024. हा कार्यक्रम 21 सप्टेंबर 2024 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य व कला रंगमंच येरवडा या ठिकाणी नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला.
याचे आयोजक प्रियांका वहिले यांनी कार्यक्रमाची खूप छान तयारी केली होती आणि खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी सादर केला. प्रियंका वहिले यांनी डिझाईन केलेले कपडे या ठिकाणी सादर करण्यात आले या डिझायनर म्हणून किती उत्तम कामगिरी करतात हे या कार्यक्रमात दिसून आले त्याचबरोबर बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये देखील सुरज चव्हाण आणि डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार यांना देखील त्यांचे कपडे देत आहेत त्याबद्दल या ताईंचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक.
या कार्यक्रमात ॲड.प्राजक्ता दिलीप घोलप (मानसशास्त्रज्ञ आणि कायदेशीर सल्लागार) यांना उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख रोहिणीताई मानकर यांनी केले, तसेच या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी आणि इंस्टाग्राम स्टार यांनी देखील हजेरी लावली होती यांना देखील पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी प्रियंका ताईंचे मनापासून आभार मानते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते धन्यवाद....