डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य काैतुकास्पद -पाेलीस निरीक्षक संताेष डाेके
दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम - डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य काैतुकास्पद -पाेलीस निरीक्षक संताेष डाेके डाॅ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग, जिल्हा रायगड यांच्या नेतृत्वाखाली दाैंड, श्रीगाेंदा, केडगाव, येथील श्री सदस्यांनी मंगळवार दिनांक १७/९/२०२४ राेजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत गणेश विसर्जनाच्या निमित्ताने अायाेजित निर्माल्य संकलन कार्यासाठी दाैंड येथील गणेश विसर्जन घाटाच्या परिसरात सर्व गणेश भक्तांनी निर्माल्य निर्माल्य कलशामध्येच टाकण्याचे आवाहन श्री सदस्यांनी केल्यामुळे दाैंड शहर व परिसरातील सर्वच गणेश भक्तांनी श्री सदस्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व निर्माल्य एकत्र केले जात हाेते. व एकत्र केलेले निर्माल्य ट्रक्टरच्या ट्रालिमध्ये साठवले गेले. या कार्यासाठी १०७ श्री सदस्यांनी दाेन ट्रॅक्टर व ट्राॅलिच्या साह्याने सुमारे ३ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. व संकलित केलेले सर्व निर्माल्य एका श्री सदस्याच्या शेतात खड्डा खाेदून त्यामध्ये टाकून त्यापासून कंपाेष्ट खत निर्मिती केली जाते. व त्या खताचा वापर शेतीसाठी केला जातो. या निर्माल्य संकलनामुळे भीमानदी पात्रात हाेणा-या प्रदूषणाला आळा बसत आहे. यामुळे भीमानदी पात्राने माेकळा श्वास घेतला असल्याचे भाविकांमधून दाैंड बाेलले जात आहे.
एकंदरीत या निर्माल्य संकलनामुळे भीमानदी पात्र स्वच्छ दिसत आहे दाैंड नगरपरिषद, दाैंड पाेलीस स्टेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.