आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हाती तलवार ; तलवार बाजी स्पर्धेचे भरणे यांच्या हस्ते उद्घाटन
इंदापूर - कळंब ता. इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रिडा समिती यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन मुले व मुली तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे सचिव वीरसिंह रणसिंग,माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे चेअरमन रामचंद्र कदम, प्राचार्य डॉ विजय केसकर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग ,महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना उपाध्यक्ष कविता भैरट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे क्रीडा विभाग सहसचिव ऋषिकेश कुंभार , महाविद्यालयाचे माजी कार्यालयीन अधीक्षक शिवाजीराव कदम, डॉ. गौतम जाधव डॉ. सुहास भैरट (क्रीडा विभागप्रमुख) , ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे इ मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी आमदार दत्तात्रय भरणे मामांनी इंदापूर तालुक्याला सोन्याचे दिवस आणले व मामांचे या महाविद्यालयावरती नेहमी सहकार्य व मार्गदर्शन असते. मामाच्या माध्यमातून महाविद्यालयाचा सर्वागीण विकास झाला असल्याचे मत रणसिंग यांनी व्यक्त केले.
आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे अशी ग्वाही दिली. मी कोणाला मदत दिली नाही तर मी सहकार्य केले असल्याचे सांगितले. ज्या झाडाला चांगली फळ लागतात लोक त्याच झाडाला दगड मारतात असाही टोला मामांनी लगावला. त्यामुळे आपण कोणाचाही विचार न करता आपण आपलं काम चांगलं पुढे करत राहिले पाहिजे असा सल्ला मामांनी श्रोत्यांना दिला.स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील १५ महाविद्यालय व ३९ स्पर्धेकानी सहभाग घेतला. यामध्ये मुली गटातुन इपी प्रकारामध्ये प्रथम क्रमांक गांधवे सिद्धी एस एम जोशी कॉलेज हडपसर, ऐश्वर्या सावंत एम एम आय टी कॉलेज लोहगाव, शर्वणी बाचल टी सी कॉलेज बारामती, तृतीय क्रमांक स्नेहल गावडे टीसी कॉलेज बारामती , फॉईल प्रकारामध्ये प्रथम क्रमांक निर्मिय मेकाले डी वाय पी ए सी एस पिंपरी, द्वितीय क्रमांक सई सांडभोर एच आर एम राजगुरुनगर, तृतीय क्रमांक सिद्धी गांधवे एस एम जोशी कॉलेज हडपसर, तृतीय क्रमांक शर्वणी बाचल टी सी कॉलेज बारामती ,सेबर गटातून प्रथम क्रमांक ऐश्वर्या सावंत एम एम आय टी कॉलेज लोहगाव,द्वितीय क्रमांक दिव्या कंवर आर्मी कॉलेज काणे , तृतीय क्रमांक शिवानी येळे टीसी कॉलेज बारामती ,तृतीय क्रमांक शर्वरी बाचल टी सी कॉलेज बारामती, मुले गटात ई पी प्रकारामध्ये सत्यम कुंभार प्रथम क्रमांक टी सी कॉलेज बारामती, द्वितीय क्रमांक विघ्नहर वाळुंज एच आर एम महाविद्यालय राजगुरुनगर, तृतीय क्रमांक अमर साठे टीसी कॉलेज बारामती ,तृतीय क्रमांक सहीम आतार टी सी कॉलेज बारामती. फॉईल प्रकारामध्ये प्रथम क्रमांक अमर साठे टीसी कॉलेज बारामती, द्वितीय क्रमांक तुषार ठवरे टी सी कॉलेज बारामती, तृतीय क्रमांक श्रेयस टांकसाळे टीसी कॉलेज बारामती, तृतीय क्रमांक अक्षय राजपूत टीसी कॉलेज बारामती, सेबर प्रकारामध्ये प्रथम क्रमांक श्रेयस टांकसाळे टीसी कॉलेज बारामती , द्वितीय क्रमांक समर्थ वाटाणे जी एच रायसोनी वाघोली ,तृतीय क्रमांक प्रवीण मस्के टी सी कॉलेज बारामती,तृतीय क्रमांक अक्षय रजपूत टीसी कॉलेज बारामती या खेळाडू यांनी यश संपादन केले. पदक विजेते खेळाडू यांची आंतर विभागीय स्पर्धे करता निवड झाली आहे सर्वसाधारण विजेतेपद तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती पटकावले.
सूत्रसंचालन डॉ. प्रशांत शिंदे यांनी केले.विविध महाविद्यालयातून स्पर्धेसाठी उपस्थित असणारे शारीरिक शिक्षण संचालक, संघ व्यवस्थापक आणि स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.