कुरणेवाडीत गणेश मंडळांच्या मिरवणुका उत्साहात पार|ग्रामस्थांकडून मंडळाचे कौतुक
सोमेश्वरनगर सोमनाथ जाधव प्रतिनिधी -;सध्या गणेश उत्सवाची सगळीकडे धूम सुरू आहे. सगळीकडे गणेश मंडळे अगदी उत्साहात कार्यक्रम करत आहेत आणि आता गणपती विसर्जनाची वेळ आहे. आणि काही वेळा गावातील मंडळे एकमेकांना शह देण्यासाठी काहीतरी करत असतात परंतु याला अपवाद कुरणेवाडी येथील दोन्ही गणेश मंडळे ठरले.
जय गणेश तरुण मंडळ कुरणेवाडी व शिव गणेश तरुण मंडळ कुरणेवाडी या मंडळांचा गणपती विसर्जन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.दोन्ही मंडळांच्याकडून आपल्या गणरायाचे विसर्जन मिरवणूक भव्य दिव्य अशी मिरवणूक काढलीं .आकाशात फटाक्यांची आताशबाजी करीत उत्साहात प्रशासनाने निर्बंध घालून दिलेल्या वेळेच्या अगोदर पार पडली. ही मिरवणूक पाहण्यासाठी गावातील सर्वच ग्रामस्थ उपस्थित होते. मंडळातील कार्यकर्ते व गणेश भक्तांनी डीजेच्या तालावर थिरकण्याचा आनंद घेतला. दोन्ही मंडळाच्या मिरवणुका एकत्र निघूनही कोणत्याही प्रकारचे गालबोट लागले नाही त्यामुळे एक आदर्शवत मिरवणूक म्हणून ग्रामस्थांनी दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व अशा प्रकारेच आपल्या गावातील एक व अनेकही मिरवणुका उत्साहात पार पाडाव्यात असे सांगितले. गणरायाला निरोप देताना मात्र गणेश भक्तांचे डोळे पाणावले.